The Terminal ✈️
काही दिवसांपूर्वी Tom Hanks या अभिनयसम्राटाचा ‘ The Terminal ‘ हा चित्रपट परत एकदा पाहीला. मी फारसे इंग्रजी चित्रपट पहात नाही पण हा चित्रपट मला फार आवडतो. न्युयाॕर्कला जाण्यासाठी विक्तोर (मी व्हिक्टरच म्हणते 😊) JFK Inernational Airport वर येतो पण तो न्युयाॕर्कलाही जाऊ शकत नाही आणि त्याच्या देशातही. युध्दामुळे त्याच्या देशाचं अस्तित्व संपून गेल्याने तो Airport वरच अडकून जातो. म्हणजे ‘ न इधरका ना उधरका ‘ अशी त्याची परिस्थिती असते. यात Airport वरचं वातावरण, तिथली माणसं, त्यांची मानसिकता छान पध्दतीने दाखवली आहे.
हे आठवण्याचं पण एक कारण आहे. गेली काही वर्षं मी सातत्याने प्रवास करतीये, तोही विमानाने . त्यामुळे वेगवेगळ्या विमानतळावरचे वातावरण अनुभवण्याची, निरीक्षण करण्याची संधी मला मिळाली. यात पुणे, दिल्ली, मुंबई, लखनौ, भोपाळ, भटिंडा अशा भारतातल्या काही ठिकाणी मी गेलीये. सुरवाती सुरवातीला विमानतळावर शिरताना मला फार भारी वाटायचं, आपण कोणीतरी ‘ खास ‘ वगैरे आहोत असं वाटायचं पण कालांतराने हा गोड गैरसमज दूर होत गेला. विमानप्रवासाचे दर कमी झाल्याने आपल्यासारखे सामान्य लोक याचा फायदा घेउ लागलेत हे मला नंतर जाणवायला लागलं.
रेल्वेनेही 🚂मी तितकाच प्रवास करते. रेल्वे उशीरा येणं किंवा मला उशीर होणं,चुकीच्या फलाटावर/ स्थानकावर उभं राहणं, अक्षरशः पळत पळत रेल्वे/ विमान पकडणं असे सर्व प्रकार 😄माझे करुन झालेत. स्थानकावर विवीध ठिकाणी जाणार्या गाड्यांसाठी झुंबड उडालेली असते म्हणून बर्याच वेळा मला रेल्वे स्थानक आणि विमानतळ दोन्हीकडची परिस्थिती सारखीच वाटते.अगदी अशीच लोकांची झुंबड आता विमानतळांवरही दिसतेच. कुठल्याही वेळी अगदी मध्यरात्रीही जा, विमानतळ माणसांनी खचाखच भरलेले असते. देशाच्या एका कोपर्यापासून दुसर्या कोपर्यापर्यंत विमाने उपलब्ध आहेत आणि गर्दीही तेवढीच आहे हे पाहून आश्चर्यही वाटते.पण कुठल्याही विमानतळावर जा तिथलं वातावरण साधारण एकसारखंच असतं. तिथलं खाणं हे आपल्या खिशाला न परवडणारं आहे. एकदा दिल्लीच्या विमानतळावर आम्ही १८०/- ला एक प्लेट पाणीपुरी घेतली. एकशे ऐंशी भागीले सहा म्हणजे तीस रुपयाला एक पुरी हा हिशोब करत मी पुरी खाल्ली आणि जो ठसका लागला😉 की तो जायचं नाव घेईना. चव म्हणलं तर अगदीच साधारण. स्वच्छता म्हणाल तर समोरुन तर चकाचक पण आत कोणी पाहीलंय, दृष्टीआड सृष्टी. बाकीचे दर पाहीले तर पुण्यात मैत्रीणींबरोबर गेल्यावर एकत्र जेवढी रक्कम होईल तेवढ्यात दोघेजण थोडंफार खाउ शकू हे लक्षात आलं.एकदा पाणी न्यायचं विसरले तेव्हा शंभर रु ची बाटली विकत घेताना डोळ्यातून पाणी 😜आले. तेव्हापासून आजतागायत माझ्याबरोबर कायम खाण्याचा डबा व पाणी असतेच. बाकी एखादी गोष्ट भले विसरली तरी चालेल.
अनेक प्रकारचे प्रवासी विमान फलाटावर पहायला मिळतात. सोबत घरचा डबा आणणारे, cheese burst pizza & Capachino असं खाणारे,गावातले, स्वतःला ‘extra special’ समजणारे, इंग्लीश फाडणारे, प्रथमच विमानप्रवास करण्यासाठी उत्सुक असणारे, वृद्ध , चाकाच्या खुर्ची वर बसलेले तर त्यासाठी लागणार्या मदतनीसाला नोकर समजून त्यांच्याशी बोलणारे अशा अनेक प्रकारची माणसे. यात पंजाबी, गुजराथी, बंगाली, मराठी, बिहारी इ. अनेक राज्यातले याशिवाय विमानतळा वर येताना मेकअपने सजलेल्या फॕशन क्विन्स, काहीजण एकदम साधे, माणसांचे किती प्रकार वर्णावे तेवढे कमीच पडतील. प्रत्येकाच्या चेहर्यावरचे भावही वेगवेगळे, चिंताग्रस्त, आनंदी, तणावग्रस्त. हे भाव वाचायची, माणसांचं निरीक्षण करायची मला सवय लागलीये. मग मी कल्पना करायला लागते यांच्या घरी काय झाले असेल, यांना काय ताण असेल, कुठे राहत असतील वगैरे😊. पण यामुळे माझा प्रवास मनोरंजक, सुखकर होतो. मला कधीच कंटाळा येत नाही. उलट एवढी विवीधरंगी, विवीधढंगी माणसं क्वचीतच पहायला मिळतात मग त्यांना वाचायची संधी मिळते.
विमानतळावरची सजलेली दुकाने हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. यातील वस्तु, कपडे खरंच कोणी विकत घेत असेल? मला तर नेहमीच माझ्यसारखे window shopping करताना बहुतेकजण दिसतात. कारण तिथल्या किंमती अव्वाच्या सव्वा असतात. सगळ्या नामांकीत brands ची दुकाने इतकी सुंदर सजवलेली असतात की कोणाचेही लक्ष जायलाच पाहीजे.पण ती चालतात का , चालत नसतील तर ती चालु कशी ठेवत असतील? म्हणजेच ती चालत असणार असा निष्कर्ष मी काढला. आपल्या मात्र खिशाला परवडणारं नाही हे एक सत्य आहे.
भारतातील प्रत्येक सणांना इथे सजावट करतात. ती इतकी सुंदर असते की डोळ्यांचे पारणे फिटेल. दिवाळीला रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, नाताळमधे सुंदर व भव्य christmas tree, नवीन वर्षी आकर्षक रोषणाई, फुगे यामुळे लोक फोटो,selfie काढत असतात.
विमानासाठी थांबलेले लोक एकतर खात असतात किंवा आपल्या मोबाईलमधे, लॕपटाॕपवरच असतात. कोणी पुस्तक वाचताना फारसं दिसत नाही.
या प्रवासादरम्यान एक गोष्ट मला नक्कीच जाणवली की भारतात विमानाने प्रवास करणार्यांची संख्या प्रचंड वाढलीये. अनेक शहरे, राज्ये व देश एकमेकांशी जोडली गेलीयेत. आता सगळा देश आपल्या आवाक्यात आहे असं वाटतं. एकमेकांच्या संस्कृतीशी ओळख होते, आपण सगळे एक आहोत ही भावना निर्माण होते. आपल्या कुठल्यही प्रवासात वेगवेगळ्या संस्कृतीचे, राज्याचे आपले सहप्रवासी असतात. राज्य, भाषा कुठलीही असो शेवटी माणूस सगळीकडे सारखाच असतो हे सत्य अशा ठिकाणी प्रत्ययाला येते.
इतक्या झपाट्याने प्रगती करत असलेल्या, विवीधतेने नटलेला, आर्थिकदृष्ट्या सधन असलेला आपला देश या प्रवासात एकीकडे पहायला मिळतो पण त्याचवेळी रेल्वेने प्रवास करत असताना रुळाच्या दोन्ही बाजूला पसरलेली गरीबी, अस्वच्छता, अशिक्षीतपणा याकडे पाहवत नाही. चकाचक, स्वच्छ , झगमगलेले विमानतळ एका बाजूला तर अस्वच्छता, कचरा,दुर्गंधीने भरलेले रेल्वेस्टेशन व आसपासचे वातावरण दुसर्या बाजूला. कुणीतरी म्हणलंय ना इंडिया आणि भारत वेगवेगळे आहेत हे सगळं डोळ्याला दिसतं, फरक जाणवतो आणि मग मनाला पटायला लागतं. कसा समन्वय साधणार आहोत आपण या दोन्हीत??? खूप काही करायला हवंय......आपल्यालाच....
@ सौ. अंजली जोगळेकर .