आज मातृ दिन. माझ्या आईचा त्याग, तिचे आमच्यावरील प्रेम,त्यासाठी तिने घेतलेले अपरिमित कष्ट ,निष्ठा हे कसं विसरता येईल? ज्या काळात स्त्रीयांचं बाहेर पडणंसुध्दा अवघड होतं अशा काळात बाहेर पडून, आयुष्यभर शिक्षीकेची नोकरी करुन एकहाती तिने आम्हा तिघांना वाढवलं. यासाठी तिने जो लढा दिला तो आठवला तरी माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. माझ्या सख्ख्या मावशीने, ताईमावशीने, तिला भक्कम पाठींबा दिला. या दोघींना वंदन केल्याशिवाय मातृदिन पूर्ण होउच शकत नाही.
आई होणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म आहे असं म्हणतात.नउ महिने बाळाचा सांभाळ करुन त्याला जन्म देणं हा एक आनंदाचा सोहळा असतो.प्रत्येक गोष्टीसाठी पोटातला तो जीव आईवर अवलंबून असतो.आई खुश तर तो इवलासा जीवही खुश. म्हणूनच आईची मनःस्थिती खूप महत्वाची असते. या काळात खूप चांगली पुस्तकं वाचावीत असं म्हणतात. त्याचं तंतोतंत पालन मी केलं. एक मुलगा आणि एक मुलगी यांची आई होण्याचं भाग्य मला लाभलं.सचिनच्या वेळी मी शिवाजी महाराजांवरचे ' श्रीमान योगी ' आणि मितालीच्या वेळी 'झाशीची राणी लक्ष्मीबाई ' ही पुस्तके जाणीवपूर्वक वाचली होती. एक प्रकारे गर्भसंस्कारच नाही का?माझे सासरे म्हणूनच सचिनला 'राजे' आणि मितालीला कायम ' लक्ष्मी' अशी हाक मारायचे. दोघांना वाढवणे हा आई म्हणून अनेक अनुभव, आव्हाने आणि समाधान,आनंद यांचा सुंदर प्रवास होता.
या दोघांना मोठ्ठं करताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. मुलगा व मुलगी यांना वाढवतानाचे अनुभव खूप वेगळे असतात असं मला वाटतं. मुली खूप भावनाशील असताता, त्या व्यक्तही होतात पण त्यांना खूप सांभाळावे लागते. त्यांचे मुड्सही प्रत्येक वेळी वेगळे असतात, दर महिन्याच्या मासिक पाळीच्या वेळी ते बदलत असतात. ते समजून घेउन त्याप्रमाणे त्यांच्याशी वागावे लागते. यामधे आपल्या चिकाटीचा कस लागतो पण याच मुली मोठ्या झाल्यावर सर्वात जास्त आपल्याला समजून घेतात, प्रेम करतात, काळजी घेतात. मुले भावना व्यक्त करु शकत नाहीत. पण त्या भावना ओळखणे हे आईचेच काम असते. त्यांचे विश्व घराबाहेर मित्रांमधे जास्त असते. याचा अर्थ घरात लक्ष नसते असं नाही. पण ते बोलत नाहीत. त्यांच्या विश्वाकडे लक्ष ठेवावे लागते . अनेक वेळा ते भरकटतात पण परत रस्यावर येतात. खूप काळजीही घेतात पण मुलींसारखे ते बोलत नाहीत. त्यांना वाढवताना खूप समंजसपणा, शांतपणा दाखवावा लागतो.
दोघांना वाढवताना माझ्यामधे एक व्यक्ती म्हणून खूप चांगले बदल झाले. आधीची 'मी' आणि आत्ताची आई झाल्यावरची 'मी ' यात आमुलाग्र बदल झालेला आहे. या दोघांनी मला आई म्हणून आयुष्यातील सर्वात उच्च असा अनुभव दिला आहे. आज या दोघांकडे पाहताना आई म्हणून मला खूप अभिमान वाटतो, समाधान वाटतं,आनंद वाटतो. या दोघांनी जे सुख मला दिलंय त्याची उतराई मी होउ शकत नाही.. एक व्यक्ती म्हणून माझा पुनर्जन्म झालाय..नक्कीच .
मला वाटतं प्रत्येक आईचे असेच अनुभव असतील, हो ना मैत्रीणींनो?
@ अंजली जोगळेकर.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा