मैत्री दिन
आज मैत्री दिन. या दिवसाची संधी साधून जरा मैत्रिणींबद्ल लिहू असं ठरवलं. लहानपणापासून बघायला गेलं तर शाळेत फारशा मैत्रीणी मला नव्हत्या. पुढे काॕलेजमधे प्रवेश घेतल्यावरही ३/४ मैत्रीणींपुढे काही माझी गाडी गेली नाही. लग्न झाल्यावर मात्र ही परीस्थिती बदलली. दोन्ही मुलांच्या शाळेच्या निमीत्ताने पालक असलेल्या आम्ही आया मैत्रीणी झालो. मोठ्या मुलाच्या वेळी झालेली मैत्री स्थिरावेपर्यंत मुलीच्या शाळा प्रवेशाची वेळ झाली. माझ्या मैत्रीणींच्या संख्येत वाढ व्हायला मग अजिबात वेळ लागला नाही. हळूहळू संसारात स्थिरावल्यावर मुलांच्या पलीकडे माझं क्षितीज विस्तारायला लागलं,नवनवीन ओळखी होउ लागल्या आणि मग वय हा मुद्दा मैत्रीसाठी गौण ठरायला लागला. माझ्यापेक्षा खूप लहान/ मोठ्या अगदी आज्यासुध्दा माझ्या सख्यांच्या यादीत भर घालू लागल्या. बघता बघता माझ्या मैत्रीचा परीघ विस्तारत गेला. या मैत्रीणींनी मला खूप काही दिले. खूप मैत्रीणी असणारी मी म्हणूनच गर्भश्रीमंत आहे.
त्यांच्याबरोबर थोडासा वेळ जरी घालवला तर एकदम ताजंतवानं वाटायला लागतं. एकत्र जमून कुठल्याही विषयावर बोलून खळखळून हसलं ना की सगळे ताणतणाव दूर होतात. मनसोक्त गप्पा मारल्या की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. मैत्रीणींसोबत थोडं बाहेर फिरून आलं की पुढील काही दिवसांसाठी नवा उत्साह मिळतो. अडीअडचणींचा सामना करायला बळ मिळतं. यातल्या प्रत्येक जणींकडून काहीनाकाही शिकण्यासारखं आहे. सुंदर लिहीणार्या, सदैव मदतीस तयार असणार्या, सुगरण, व्यवस्थित, कलात्मक, दिलदार, दुसर्याचे भरभरुन कौतुक करणार्या, हसतमुख, आनंदी, सकारात्मक, धीट, धाडसी,अष्टपैलू, साध्या असे विवीध पैलू असणाऱ्या या माझ्या मैत्रीणींसाठी माझ्या हृदयात एक खास जागा आहे, ध्रुवासारखी अटळ. यांनी माझं आयुष्य खूप आनंददायी, सकारात्मक बनवायला मला मदत केलीये. आज आम्हा सगळ्यांची मैत्री लोणच्यासारखी छान मुरलीये, चवीष्ट झालीये. त्याचा आनंद आम्ही घेतोय. एक व्यक्ती म्हणून वाटचाल करताना, समृद्ध होताना त्यांचं स्थान अनमोल आहे. त्यांच्या शिवाय आयुष्य साजरं होउच शकत नाही. या सगळ्या माझ्या खास मैत्रीणींना #मैत्रीदिनाच्या खास शुभेच्छा .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा