माझ्या प्रत्येक मैत्रीणीला समर्पीत....
सखी
इकडच्या स्वारीसोबत नव्या घरी आले
अनोळखी वळणांवर अनेकदा धडपडले
आव्हानांशी भिडता वारंवार चुकत गेले
नाती निभावताना कितीदा तरी बावरले
सखे
तु साथ दिलीस अन मी सावरले
गुजगोष्टी करून मन मोकळे झाले
नवउमेदीने जीवनाला सामोरी गेले
तुझ्या निखळ आनंदात चिंब भिजले
तुझ्या सवे इंद्रधनुषी रंंगात रंगले
आनंदाचे , उत्साहाचे क्षण वेचले
हृदयाच्या आत स्थान तुला दिले
अपूर्ण मी तुझ्याविना सखे होऊन गेले
अपूर्ण मी तुझ्याविना सखे होऊन गेले.
@ अंजली जोगळेकर
Happy friendship day girls😘😘🌹🌹💐❤
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा